बीड जिल्ह्यातील लाडझरीत भूगर्भातून आवाज ;सौम्य हादरे ही जाणवले

54

बीड जिल्ह्यातील लाडझरीत भूगर्भातून आवाज ;सौम्य हादरे ही जाणवले

बीड जिल्ह्यातील लाडझरीत भूगर्भातून आवाज ;सौम्य हादरे ही जाणवले
बीड जिल्ह्यातील लाडझरीत भूगर्भातून आवाज ;सौम्य हादरे ही जाणवले

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
परळी — तालुक्यातील लाडझरी येथे सोमवारी अचानक भूगर्भातून आवाज येऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.सोमवारी सकाळी 8.30 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण सात वेळा आवाजासोबतच हादरा बसल्याची माहिती मिळाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरू झाली. आवाजाचा सोबतच जमिनीत कंपन जाणवू लागल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण तयार झाले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज ऐकावयास मिळाला. त्यामुळे अक्षरशः हा भाग भूकंपाचे हादरे बसल्यासारखा हादरला गेला.दरम्यान
प्रशासनाला माहिती मिळताच आवाज येत असलेल्या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक, मंडळ अधिकाऱ्यांनी भेट देत याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली आहे. आवाज येत असलेल्या ठिकाणी मंगळवारी भूजल सर्वेक्षण विभागाचे पथक पाहणी करणार आहे. त्यानंतरच याबद्दलची अधिक माहिती मिळेल, असे परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सांगितलेहनागरिकांनी भयभीत होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.या सर्व प्रकारावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. याआधीही पावसाळ्यात तालुक्यातील मोहा येथे भूगर्भातून असेच आवाज येत होते. मात्र संशोधनानंतर जास्त झालेल्या पावसाने भूगर्भातून असे आवाज येत असल्याचे समोर आले. यंदा पाऊस जास्त झाल्याने भूगर्भातून हे आवाज येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी दिली.