महिला व मुलीचा हत्या करून आरोपी फरार, हत्याचे कारण गुलदस्त्यात.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर दि. 27 सप्टेंबर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
कळमेश्वर – झुणकी रोड वरील एका शेतामध्ये एका नराधामाने महिलेचा गळा आवळून तर मुलीचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दिनांक 27 सप्टेंबर 2021 चे 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यामूळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे. हत्याचे कारण अज्ञात असून खून करून आरोपी फरार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर झुनकी रोडवर श्रावण घोडपागे नागपूर यांचे शेत आहे हे शेत त्यांनी कळमेश्वर येथील ललित गजानन गणोरकर यांना ठेका पद्धतीने दिले असून दोन दिवसापूर्वी 30 वर्षीय महिला आणि दहा वर्षीय मुलीसह एक इसम ललित गणोरकर यांना त्यांच्या शेतामध्ये काम मागण्यासाठी आला शेतकरी ललित गणोरकर यांनी वर्षभर काम करणार असेल तर काम देतो नाहीतर आपले सोबत आणलेले सामान घेऊन जा असे त्यास सांगितले मात्र त्याने एक-दोन दिवस राहतो असे म्हणून झोपडीमध्ये राहिला मात्र आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान शेतकरी ललित गणोरकर हे शेतात आले असता झोपडीमध्ये त्यांना महिला आणि मुलगी मृतावस्थेत असल्याचे दिसले त्यांच्यासोबत असलेला इसम फरार झाल्याने शेतकरी ललित गणोरकर यांनी लगेच पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अशोक सरंबळकर, ठाणेदार आसिफ रजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर गेले यावेळी घटनास्थळावर निरीक्षण केले असता दगड, पावशी आणि दोरी असे साहित्य मिळून आले. महिलेला गळा आवळून तर मुलीला दगडाने ठेचून मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याचे माहिती असून गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीला नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तसेच कळमेश्वर पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती आहे कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कळमेश्वर पोलिस करीत आहे.