पंचायत समिती आपल्या दारी आरंभी गणात आढावा सभेचे आयोजन सभापती अनिता राठोड यांचा पुढाकार

56

पंचायत समिती आपल्या दारी आरंभी गणात आढावा सभेचे आयोजन

सभापती अनिता राठोड यांचा पुढाकार

पंचायत समिती आपल्या दारी आरंभी गणात आढावा सभेचे आयोजन सभापती अनिता राठोड यांचा पुढाकार
पंचायत समिती आपल्या दारी आरंभी गणात आढावा सभेचे आयोजन
सभापती अनिता राठोड यांचा पुढाकार

मीडिया वार्ता
✍🏻 राम राठोड ✍🏻
तालुका प्रतिनिधी दिग्रस
मो. नं.:- 9422160416

दिग्रस तालुक्यातील आरंभी गणामध्ये सभापती सौ.अनिताताई राठोड व जि. प. सदस्य सौ. रुख्मिना उकंडे यांच्या पुढाकाराने पंचायत समिती आपल्या दारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यात येणार आहे.

आरंभी गणातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्रपणे पंचायत समिती आपल्या दारी आढावा बैठक दिनांक २९ सप्टेंबरला बुधवार ग्रामपंचायत कार्यालय चिरकुटा वेळ सकाळी नऊ वाजता तर ग्रामपंचायत कार्यालय सावगा येथे दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये पूर परिस्थिती व पीक विमा सर्वे तसेच कोरोना व इतर साथीच्या रोगांवर मार्गदर्शन व आवास योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील विविध योजनेची माहिती आरोग्य विभाग पशुसंवर्धन तसेच शिक्षण या विषयावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या सभेला प्रमुख उपस्थिती सभापती सौ. अनिताताई दिवाकर राठोड, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ. रुख्मिनाताई विष्णू उकंडे, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, विस्ताराधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक इत्यादी उपस्थित राहणार असून नागरिकांनी उपस्थित राहून पंचायत समिती आपल्या दारी या सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती अनिताताई दिवाकर राठोड यांनी केले.