*खापरखेडा डीबी शाखेच्या पथकाने बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर टाकला छापा

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर ; – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत चनकापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये खापरखेडा डीबी शाखेच्या पथकाने बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आणि पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाशिवाय देशी आणि विदेशी दारू बनवण्यासाठी 2 मशीन , 5 ट्रे डुप्लिकेट देशी दारू, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्यांच्या 15 पोती, 50 लिटरचे 8 डबे, 50 लिटर दारू, देशी आणि विदेशी दारूचे लेबल, 8 बोरोमध्ये दारूच्या पेट्या, 2 बाईक, 2 चारचाकी वाहन , एकूण 17 लाख रुपयांचा माल जप्त केलेला आहे.आणि घटनास्थळावरून आरोपी विशाल शंभू मंडल, मिथुन शहा या दोघांना अटक करण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून बनावट दारू बनवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहे.दरम्यान नागपूरला गुन्हा काही नवीन नाही. 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार गर्भापात केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.