घुग्घुस येथे काँग्रेसचे रस्ता रोको आंदोलन
काँग्रेसला घरचा अहेर, मोठया नेत्यांची दांडी

काँग्रेसला घरचा अहेर, मोठया नेत्यांची दांडी
पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
बुधवार 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता घुग्घुस येथील राजीव रतन चौकात घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीतर्फे भव्य रस्ता रोको आंदोलनल करण्यात आले.
घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावरील धूळ-खड्डे व अपघाताने जनतेचे जगणेच हराम झाले आहे. घुग्घुस शहरातून होणारी कोळश्याची जडवाहतूक विरोधात तसेच घुग्घुस-म्हातारदेवी रस्ता दुरुस्तीबाबत घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीतर्फे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे काँग्रेस पक्षाचे आहे खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहे तर अपक्ष आमदारचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा आहे.
आपल्याच सत्ताधारी पक्षाविरुद्ध घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावरील धूळ-खड्डे व अपघाताने जनतेचे जगणेच हराम झाले आहे असे म्हणत रस्ता रोको आंदोलन घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीने केले असे आंदोलन करून घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीच्या नेत्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला घरचा अहेर दिला आहे. हे आंदोलन करून सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे अपयश दाखविले आहे. घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावरील धूळ-खड्डे व अपघाताने घुग्घुसच्या जनतेचे जगणेच हराम झाले आहे तर यासाठी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस, जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार हे जबाबदार आहेत.
सत्ताधाऱ्या विरुद्ध आंदोलन करणे हे विरोधी पक्षाचे काम असते परंतु घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीच्या नेत्यांनी हे रस्ता रोको आंदोलन करून आपल्याच काँग्रेस पक्षाला घरचा अहेर दिला आहे.
या रस्ता रोको आंदोलनास घुग्घुसच्या किसान सेल, एससी सेलच्या मोठया नेत्यांनी दांडी मारली. अवघ्या काही तासातच हे भव्य रस्ता रोको आंदोलन गुंडाळण्यात आले.
आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.