*मुकुटबन येथे अदामा कंपनीचे मिरची पिकावरील चर्चासत्राचे आयोजन.*

नितेश पत्रकार (NT)
वणी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
मो,नं, 7620029220
झरी: तालुक्यातील महावीर भवन, मुकुटबन येथे अदामा इंडिया प्रा.ली. कंपनी तर्फे मिरची पिकावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चासत्राला अदामा कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर मुकेश कुमार (नागपूर झोन), रिजनल मॅनेजर विवेक नाखले (यवतमाळ रिजन), मार्केटिंग डेव्हलपमेंट मॅनेजर श्याम तुळणकर (यवतमाळ रिजन), टेरिटरी मॅनेजर स्वप्नील बाहेकर (पांढरकवडा टेरेटरी), आणि मुकुटबन विभागातील सुमारे पावणे दोनशे शेतकरी आणि पांढरकवडा चमू उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रस्तावनापर भाषणामध्ये श्री. बाहेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सोबतच कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच अदामा इंडिया कंपनीच्या उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना ओळख करून दिली. आणि अदामा इंडिया कंपनीबद्दल माहिती सांगितली.
त्यानंतर श्याम तुळणकर यांनी शेतकऱ्यांना मिरची पिकावरील रोगांविषयी माहिती करून अवगत केले. आणि मिरची पिकांमध्ये बुरशीनाशकाचे कसे अनन्यसाधारण महत्व आहेत त्याबद्दल सुद्धा सांगितले. तसेच अदामा इंडिया कंपनिच्या सिगालेट, झमीर, फ्लॅम्बर्ग या नवीन उत्पादनांचा उदघाटन सोहळा पार पाडून त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
त्यानंतर मुकेश कुमार सरांनी शेतकऱ्यांना मिरची पिकाबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मिरची पिकाच्या पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती दिली. सोबतच मिरची पिकावरील रोगांविषयी पि.पि.टी.द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.