मिठाई विक्री करतांना उत्पादन दिनांक व खाण्यास योग्य कालावधी नमूद करणे बंधनकारक

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की : सणासुदीच्या काळात मिठाई विक्री करतांना, मिठाई विक्रेत्यांनी प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याच्या दिनांकापासून तर ती वापरण्यास योग्य कालावधी, खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच दूध, खवा, खाद्यतेल, वनस्पती तूप हे अन्नपदार्थ परवानाधारक व नोंदणीकृत व्यवसायधारक यांचेकडूनच खरेदी करावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी मिठाई व्यवसायिकांना दिल्या. मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सातकर व चंद्रपूर जिल्ह्यातील मिठाई विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.
सणासुदीच्या उत्सवादरम्यान जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळी अथवा तत्सम प्रकारची मंडळे महाप्रसाद वाटप यासारखे कार्यक्रम आयोजित करतात. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारखी अप्रिय घटना घडू शकते. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पुजा संपन्न करणारी मंडळे यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कलम 31(2) च्या तरतुदीनुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे.
सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. योग्य काळावधी खण्यास योग्य असल्यचि अंतीम मुदत नमूद करणे बंधनकारक आहे