साखळी उपोषणाचा १५ वा दिवस महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी:पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने दर्शना महिला बचत गट यांचे साखळी उपोषण!

46

साखळी उपोषणाचा १५ वा दिवस

महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी:पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने दर्शना महिला बचत गट यांचे साखळी उपोषण!

साखळी उपोषणाचा १५ वा दिवस महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी:पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने दर्शना महिला बचत गट यांचे साखळी उपोषण!
साखळी उपोषणाचा १५ वा दिवस
महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी:पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने दर्शना महिला बचत गट यांचे साखळी उपोषण!

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा: ३० सप्टेंबर
येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ पोलिस प्रशासन विभागाच्या निर्मानाधिन पेट्रोल पंपची जागा शासनाने त्वरित स्थलांतरित करावी यासाठी जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाच्या १५ व्या दिवशी*दर्शना महिला बचत गट प्रमुख व आंबेडकरी नेत्या मा.वैशालीताई पाटील व भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुषमती उमाताई इंगोले यांच्या तर्फे वर 30 सप्टेंबर 2021 (शुक्रवार) रोजी सकाळी 11.00 वाजता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन,वर्धा येथे आयुषमती मालाताई दाभणे,वर्षाताई खोब्रागडे,संगीता आलोने,जोशना तुळकाने,माधुरी हाडके,जयश्री वाघमारे,सविता गायकवाड यांनी साखळी उपोषण केले आहे.येतील पाच महिलांना वर्धा पोलिसांनी अटक केली.
पेट्रोल पंप हटाव कृती समिती मधिल सहभागी सर्व आंबेडकरी व पुरोगामी संघटना कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते*
राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री सुनिल केदार,आमदार रणजित कांबळे यांच्या जातीयवादी प्रवृत्तीचा तसेच जिल्हा पोलीस व जिल्हाधिकारी प्रशासनाचा मुर्दाबाद करुन साखळी उपोषणातुन तिव्र निषेध करण्यात आला.वर्धा सिव्हील लाईन येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील पोलीस प्रशासनाच्या बांधकाम सुरु असलेल्या या पेट्रोल पंप ला आंबेडकरी जनता व जनसामान्यांचा तिव्र विरोध आहे.पेट्रोल पंप ची जागा बदलविण्यासाठी तिव्र आंदोलन सुरु असताना हा पेट्रोल पंप अजूनपर्यंत स्थलांतरित झालेला नाही,याला काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र सरकार चे प्रमुख नेते,मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्ष नेते स्थानिक खासदार,आमदार सुध्दा जबाबदार आहे.या सर्वांच्या आणि पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे यांच्या हेकेखोर प्रवृत्तीचा हा जातियवादी प्रकार उघड झालेला आहे.जिल्यातील संपुर्ण आंबेडकरी व बहुजन जनतेची अस्मिता,संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थळी आहे,येथे वर्षभर सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक व राजकीय कार्यक्रम होतात.कृती समितीचे आंदोलन आम्ही भीम सैनिक भगिनी अधिक तीव्र करु.आंदोलनात आम्ही मेलो तरी बेहत्तर,पण आता मागे हटणार नाही.अशा दर्शना महिला बचत गटाच्या प्रमुख तथा आंबेडकरी नेत्या मा.वैशालीताई पाटील यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाराष्ट्र महाविकास आघाडी चे सरकार आणि केंद्रातील पेट्रोलियम मंत्री आणि केंद्रातील भाजप सरकार व हेतुपुरस्सर सूडबुद्धीने वागत आहे.दोन्ही सरकारनी लोकभावनेचा आदर करुन वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या मागनीला न्याय द्यावा.पोलीस प्रशासनाच्या पेट्रोल पंपची जागा त्वरित स्थलांतरित करावी.अन्यथा आंदोलन चिघळेल याला जबाबदार सरकार व प्रशासन राहिल अशाही भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुषमती उमाताई इंगोले व वैशालीताई पाटील म्हणाल्या आहे.