पहाडावरील शेतकऱ्यांच नशिब रूतल गाळात!
कापुस बोंडं सडली, सोयाबीला फुटले कोंब

कापुस बोंडं सडली, सोयाबीला फुटले कोंब
भोलानाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो 8275074426
जिवती ,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की जिवती तालुक्यातील शेतकार्यनी
काळ्या आईची ओटी भरून दिवसराञ शेतात राबराब करणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी,नंतर परतीच्या पावसाचे तांडव आणि आता पुन्हा गुलाबी चक्रीवादळाने झोडपल्याने उरली सुरली पीकेही जमिनदोस्त झाली.सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले तर निबर झालेली बोंड खराब झाली. मोठ्या उमेदीने शेतात हजारो रूपये खर्च करून शिवार फुलविले माञ हातात येण्याआधीच निसर्ग कोपला यामुळे खरिप हंगामावर आयुष्याचं गणित मांडणाय्रा पहाडावरील शेतकऱ्याचं नशिबच गाळात रूतल्याचे चिञ परिसरात दिसत असून शासकीय यंञना शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसान झालेल्या पीकाचा पंचनामा करतील काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात कापूस, सोयाबीन, मुग, उडिद, तुर सारख्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सुरूवातीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिके जोमदार दिसत होती माञ जुलै महिण्यात झालेली अतिवृष्टीमुळे पीकासह जमीन खरडून वाहून गेली. त्यानंतर महिनाभर पावसाने उघडिप दिल्याने हलक्या जमिनीतील पिके कोमेजून गेली. संकटात सापडलेला शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहू लागला तब्बल महिनाभरानंतर पाऊस तालुक्यात बरसला पंरतु सततच्या पावसामुळे पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीके लाल, पीवळी होत पानगळ झाली, लागलेली बोंड झाडावरच सडली, हाती आलेल सोयाबीन पीक शेतातच भिजू लागल सतत भिजत राहिल्याने झाडावरच कोंब फुटले या संकटातून सावरण्याआधिच पुन्हा गुलाबी चक्रीवादळाचे तांडव सुरू झाली अन् उरलीसुरली पीकेही जमिनदोस्त झाली