अंगणवाडी केंद्र क्रं. 2 येथे पोषण अभियान

पंकज रामटेके
घुग्गुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
गुरुवार 30 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथील अंगणवाडी केंद्र क्रं. 2 येथे पोषण अभियान सप्टेंबर 2021चा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरण बोढे, माजी सभापती सौ. नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली ढवस, पर्यवेक्षिका शीतल भुमर, मुख्यध्यापिका मोरे, शिक्षिका येरमे, पर्यवेक्षिका पिंपळकर मंचावर उपस्तित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस समोर द्विप प्रज्वलीत व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. पोषण आहाराची प्रदर्शनी ठेवण्यात आली होती व मसाला भात वाटप करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शिका सुनीता पाटील, किरण जुनघरे, पूजा गावंडे, उषा पाझरे, काकडे, शिला सुदाला, श्रीवास्कर, अनुसया चिडे, टोंगे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, लहान मुलं, गरोदर माता उपस्थित होत्या.
संचालन उर्मिला नगराळे यांनी केले तर आभार अर्चना बेहरे यांनी मानले.