थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जनविकास कामगार सेनेच्या सुरु असलेल्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 जवळपास कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहेत.

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
फो:8378848427
मागील सोळा महिण्यापासून कामगारांचे सात महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून कामगारांनी काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मुलं -बाळ व कुटुंबासह जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन सुरु केले होते. वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत दर्शना झाडे, सविता दुधे, माधुरी खोब्रागडे व निशा हनुमंते या कामगारांनी चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालया मध्ये स्थगित आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता.