“तायक्वादो मार्शल आर्ट” मधील भारतातील सर्वात तरुणी ब्लॅक बेल्ट – अदिती कांबळे

“तायक्वादो मार्शल आर्ट” मधील भारतातील सर्वात तरुणी ब्लॅक बेल्ट – अदिती कांबळे

“तायक्वादो मार्शल आर्ट” मधील भारतातील सर्वात तरुणी ब्लॅक बेल्ट - अदिती कांबळे
“तायक्वादो मार्शल आर्ट” मधील भारतातील सर्वात तरुणी ब्लॅक बेल्ट – अदिती कांबळे

गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई :- सदर मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईची सुपुत्री व ह्या वर्षातील तायक्वादो मार्शल आर्टमधील ‘अदिती विजय कांबळे’ भारतातील सर्वात तरुण ब्लॅक बेल्टच्या प्रकारात आली आहे, अदिती कांबळे ही मुंबई सायन प्रतिक्षा नगर येथील रहिवासी असून त्याचा यशाला सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच न्यू इंग्लिश सेंकडरी स्कूल सायन प्रतिक्षा नगर या शाळेची अदिती कांबळे ही विद्यार्थ्यांनी आहे. कोरोना महामारीच्या ( लॉकडाऊन) काळामध्ये ही प्रशिक्षण सोडले नाही. स्वतःमध्ये चिकाटी, जिद्द, आणि कष्ट मेहनतीने घरूनचं प्रशिक्षण घेतले.हे तिचे यश कौतुकास्पद आहे.

अदिती कांबळे हिचे कोच मास्टर, ‘विजय कांबळे’ हे भारतातील सुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध तायक्वादो मार्शल प्रशिक्षक आणि चतुर्थ (4th) डिग्री ब्लॅक बेल्ट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मास्टर आहेत. मास्टर विजय कांबळे हे मुंबईतील (Taekwondo Academy) तायक्वादो अकॅडमीचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक आहेत.

प्रशिक्षक विजय कांबळे हे तायक्वादो मार्शलचा २२वर्षांचा प्रशिक्षण अनुभव आहे.गरीब मुलांना, विद्यार्थ्यांसाठी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या स्रियांना मोफत मार्गदर्शन व मोफत स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देणे ही त्यांची मुख्य उद्देश व ओळख आहे, त्यासाठी ते नेहमी तत्पर तयार असतात यासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो.