1 ऑक्टोबर आज ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांना एक नविन उर्जा प्रधान करु.

1 ऑक्टोबर आज ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांना एक नविन उर्जा प्रधान करु.

1 ऑक्टोबर आज ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांना एक नविन उर्जा प्रधान करु.
1 ऑक्टोबर आज ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांना एक नविन उर्जा प्रधान करु.

लेखक – प्रशांत जगताप ✒
मिडिया वार्ता न्यूज प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक हे कुठल्याही कुटुंबाचा पाया असते. त्याच पायावर कुटुंबाची पुर्ण इमारत उभारली जाते. त्या पायाच्या बेस अगर मजबूत असेल तरच कुठलाही परिवार हा एकसंध असतो. आणि त्या कुटुंबाची प्रगती झाल्या वीणा राहत नाही. म्हणुन आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सद्स्याचा आदर, प्रेमाची वागणुक, मायेचा हात हे आजच्या पिढीचे एक मोठे कर्त्यव्य आहे. आज ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त मिडिया वार्ता न्युज घेऊन येत आहे ज्येष्ठ नागरिकाच्या मनातील अंतरंग.

1 अक्टूबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने ज्येष्ठ नागरिक दिन म्हणुन घोषित केला आहे. जगातील प्रत्येक देशात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि ही संख्या भारतात पण वेगाने वाढत आहे. आज जागतिककरणामुळे जग खुप जवळ आल आहे. पण आपण आज कुठे तरी मानुसकी विसरत चाललो असल्याचे चित्र आपल्या देशातील प्रत्येक गावात दिसून येत आहे.

आपल्या वयवृद्ध आई बाबाने रक्ताच पाणी करुन, उन्हा तानात घाम गाळुन आपल्याला शीकवल, मोठ केल, एक वेळ उपाशी राहून आपल्याला दोन वेळच अन्न भरवल आणि आपण शिक्षण घेऊन नौकरी, व्यवसाय किव्हा इतर काम करुन फार मोठे झालो. आप आपल्या क्षेत्रात खुप नाव कमवल. हे सर्व त्यांची लिलया होती. पण आता आपण काय देत आहोत त्या ज्येष्ठ नागरिकांना? एकांत, हेळसाळ, दुख: आणि वृद्धाआश्रम..

आपल्याकडे अस म्हटलं जात की, चाळीशीनंतर मानवी सभावात एक नव दूरदृष्टी निर्माण होते. त्यात मनुष्य समजुन उमजून पुढील वाटचाल करतो. त्यात मुलाच शिक्षण, संगोपन, पत्नीचे हट्ट हे सर्व प्रामाणीक पणे करतो, पण आपल्या घरातील ज्येष्ठ आई वडिल यांच्या प्रति असलेले आपले कर्त्यव्य कुठे तरी दुर्लक्ष करत असल्याचे माहिती मधुन समोर आले आहे.

जेव्हा एका कुटुंबातील आई किव्हा वडिल हे वयाने ज्येष्ठ होतात म्हणजेच नव्याने ‘बालवयात’ प्रवेश करतात हेच पहिले आजच्या पिढीने समजुन घ्यायला हवे. या नव बालवयातील प्रवेशामुळे ज्येष्ठांच्या जीवनात अनेक प्रश्नही निर्माण होतात. वयानुसार आलल्या अनुभवाचे बोल गरज व कारण नसतानाही अनेक प्रसंगी देण्याचा बालहट्ट असतो. पण मुलांना तो त्यांचा जीवनात हस्तक्षेप वाटत असतो. पहिले तर दुर्लक्ष करत असतो. मग याचे रूपांतर खटक्यात होते. नंतर ते कायम भांडणाचे व ताणलेल्या संबंधांचे रूप धारण करते.

भारतील समाजात एकत्र कुटुंबपद्धत होती कालातराने शहरीकरण आणि नगरीकरण वाढायला लागले त्यामूळे कुटूंब छोटे झाले. आणि मुल ज्येष्ठ आई वडीलाबद्दल असलेल्या कर्त्यव्याला मुखला.

आज शिक्षित समाजात ज्येष्ठ नागरिक बदल स्वार्थी विचार मूळ धरतो आहे. त्यांना अस वाटत की, वृद्ध आई वडिलांन मुळे स्वतंत्र्य राहणीन, बोल्ड़नेस, मना सारखं जगता येत नाही. मग सुरु होते ज्येष्ठ नागरिकांची हयगय.

या पार्श्वभूमीवर आज समाजात वृद्धाश्रम तसेच आधारगृहांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातल्या बहुतेक चालकांचा अनुभव फार उत्साहवर्धक नाही. अनेकदा घरातील अडगळ सांभाळायला दिली आणि त्याचे पैसे मोजले की कर्तव्य संपले, असे मानून ज्येष्ठांना यात टाकले जाते. त्यांना घरी सांभाळणे, ही अनेक कारणांनी असलेली व्यवहारिक समस्या सोडविली पाहिजेच. पण वृद्धाश्रम ही आधुनिक जगातील सोय आहे. तिला डम्पिंग ग्राउंड मानले जाऊ नये. पण सर्वच निकष पैशात मोजायचे ठरविल्यावर अशा भावनेला किंमत ती काय?

जीवनातपी दुख: उदासीनता दुर सारून ज्येष्ठांनी आपली सकारात्मक ऊर्जा नव समाज उभारायला लावावी व समाजानेही ती आनंदाने व कृतज्ञतेने घ्यावी हिच ज्येष्ठ नागरिक दिना निमित्ताने शुभेच्छा.