गोंडपीपरीत महिलांची आढावा बैठक सपन्न. महिलाच्या विविध योजनावर चर्चा.

गोंडपीपरीत महिलांची आढावा बैठक सपन्न. महिलाच्या विविध योजनावर चर्चा.

गोंडपीपरीत महिलांची आढावा बैठक सपन्न. महिलाच्या विविध योजनावर चर्चा.
गोंडपीपरीत महिलांची आढावा बैठक सपन्न. महिलाच्या विविध योजनावर चर्चा.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- गोंडपिपरी येथे महीलांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा महीला काँग्रेसचा अध्यक्षा चित्राताई डांगे उपस्थित होत्या. सौ.डांगे यांनी महीलांचा विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले. चुल आणि मुल ऐवढ्यापुरते मर्यादित न राहता गरूडझेप घेण्यासाठी आता स्वता:ला सिध्द करावे लागेल आपली पण एक स्वतंत्र ओळख निर्माण करुन आपण आपल्या पायावर ऊभ राहता आल पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

गोंडपिपरी महिला काँग्रेस तर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चित्राताई डांगे बैठकीला उपस्थित होत्या. महिलांचा विविध प्रश्वावर सौ. डांगे यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृहात पार पडली. महिला बचत गटाना मिळणाऱ्या विविध योजना, कर्ज पद्धती यावर चर्चा करण्यात आली. सपना साखलवार, शारदा गरपल्लीवार, सागर मडावी, संगीता सांगडे, अर्चना झाडे, कुंदा कोंडेंकर, मीराबाई दुर्गे सह
तालूका महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, गोंडपीपरी तालुक्यातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. बैठकीचे आयोजन गोंडपीपरी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखाताई रामटेके यांनी केले.