स्वतंत्र विदर्भासाठी गोंडपिपरी येथे नागपूर करार पत्रकाची होळी व मुंडन आंदोलन.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- म. गांधी जंयतीदिनी आज गांधी चौक गोंडपिपरी येथे दुपारी दोन वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने डाॕ. संजय लोहे यांचे नेतृत्वात “नागपूर करार पत्रकाची होळी ” व स्वतंत्र विदर्भद्रोही भुमिकेच्या निषेधार्थ “मुंडन आंदोलन ” करण्यात येणार आहे.
दि. 28 सप्ते 1953 ला झालेल्या नागपूर करारान्वेय विदर्भातील जनतेला सिंचन, बांधकाम, आरोग्य , शैक्षणिक क्षेत्र व नौक-यासह इतर सर्व मिळणारे 23% आरक्षणातील अनुशेष वाढतच आहे. तो आजमितीला पुर्ण होणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी, प्रदुषन व शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवादासारखे दुष्परिणाम दुष्यस्वरुपात दिसत आहे. जंगल, जल, जमिन व खनिजांनी संपन्न असुनही विदर्भातील जनता मुलभुत सोयींपासुन वंचित आहे. विदर्भातील तरुणाईची होणारी वंचना, उपेक्षा व अन्यायाच्या विरोधात विदर्भातील युवक पेटुन उठले तर राज्यात अराजकता माजु शकते. तेव्हा काळाची पाऊले ओळखुन राज्यकर्त्यानी स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावा या मागणीसाठी गांधी चौकात सांकेतिक नागपुर करार पत्रकाची होळी व मुंडन आंदोलन विदर्भवादी नेते डाॕ.संजय लोहे यांचे नेतृत्वात करण्यात येणार आहे.
या आंदोलनात बहुसंख्य तरुण, शेतकरी व महीलांनी सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती गोडपिपरीचे अध्यक्ष अरुण वासलवार व शेतकरी संघटनेचे नेते तुकेश वानोडे, व्यंकटेश मल्लेलवार, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाल,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष, अॕड. प्रफुल आस्वले, ॲड.रुपेश सुर यांनी केले.