प्रधानमंत्री आवास योजना बाबत गटविकास अधिकारी हिंगणघाट व उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना वडनेर ग्रामस्थाचे निवेदन.

प्रधानमंत्री आवास योजना बाबत गटविकास अधिकारी हिंगणघाट व उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना वडनेर ग्रामस्थाचे निवेदन.

प्रधानमंत्री आवास योजना बाबत गटविकास अधिकारी हिंगणघाट व उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना वडनेर ग्रामस्थाचे निवेदन.

मुकेश चौधरी

उप संपादक मिडीया वार्ता न्युज 

हिंगणघाट:- प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र-ड अंतर्गत वडनेर येथील अपात्र केलेल्या २१४ लाभार्थ्यांचा फेर सर्वेक्षण करून प्रपत्र-ड चं पत्र यादीमध्ये समावेश करण्यात यावा. सन २०१६ मध्ये शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वडनेर ग्रा.प. ने मंजूर करून हिंगणघाट पंचायत समितीला पाठविलेला होता. त्यामध्ये ओबीसी, एस.सी., एस.टी., अल्पसंख्यांक लाभार्थ्याचा समावेश होता.

सन २०१८-२०१९ मध्ये सर्व ४३० लाभार्थ्यांचा हिंगणघाट पंचायत समितीचे कर्मचारी यांनी ऑनलाइन मोबाईल द्वारे सर्वेक्षण करण्यात आलेले होते. सन २०२० मध्ये संपूर्ण ४३० लाभार्थ्यांचे आधार कार्ड मापिंग करण्यात आलेले होते.

सध्या प्रपत्र-ड ची यादी प्रसिद्ध झालेली असून त्यामध्ये २१६ लाभार्थ्यांना पात्र केलेले आहे. तर २१४ गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र-ड च्या यादीत अपात्र केलेले आहे. अपात्र केलेले कारण व लाभार्थ्याचा काहीही संबंध असल्याचे दिसून येत नाही. कारण सदर यादी मधी लाभार्थी अत्यंत गरजू असून राहायला घर नसून कच्च्या घरामध्ये राहत आहे. यामध्ये अनेक लाभार्थी भूमिहीन असून, अनेक लाभार्थी कायम रोज्माजुरीचे कामे करीत आहे. बरेचसे लाभार्थ्यांचा दारिद्र रेषेच्या कुटुंब यादीत समावेश असून इंदिरा आवास योजनेत पात्र यादीत समावेश होता. परंतु सन २०१४ मध्ये शासन निर्णयानुसार इंदिरा आवास योजनेची यादी रद्द करून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली.

सर्वेक्षणमध्ये चुकीचे करणे दाखवून गरजू लाभार्थ्यांना अपात्र केल्याचे दिसून येत आहे. शासन निर्णयानुसार वडनेर ग्रा.प. मध्ये दि. २८/०९/२०२१ ला प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र-ड बाबत सौ. कविता विनोद वानखेडे यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये अपात्र केलेल्या सर्व २१४ लाभार्थ्यांचा फेरसर्वेक्षण करून पात्र करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केलेला आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र-ड मध्ये सर्व २०१४ लाभार्थ्यांना समावेश करावा अशी मागणी सौ. कविता विनोद वानखेडे, सरपंच ग्रा.प. वडनेर, श्री विनोद वानखेडे, मा. सरपंच व संचालक कृ.उ.बा.स., श्री सुभाष शिंदे, उपसरपंच, श्री आसिफ शेख, ग्रा.प. सदस्य, सौ. रीना तगडे, ग्रा.प. सदस्य, सौ. मंदाताई आत्राम, ग्रा.प. सदस्य, सौ. वनिता कळसकर, ग्रा.प. सदस्य, सौ नम्रता भगत, ग्रा.प. सदस्य, सौ. दिपाली भुते, ग्रा.प. सदस्य, सौ. वर्षाताई भोयर, ग्रा.प. सदस्य, श्री गजानन तागडे, माजी ग्रा.प. सदस्य, राहुल भुते, अध्यक्ष हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (ओबीसी) तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी, गणेश घोडमारे, अमित झाडे, जनार्धन दांडेकर, शंकर दांडेकर, देविदास दांडेकर, कैलास घोडमारे, समीर वैतागे, मंगला काकड, प्रशांत जीवतोडे, प्रणय डोफे, प्रदीप उमरे, नारायण मानकर, मालुबाई लाखे, अनुसया वात्मोडे, कुसुमबाई पारिसे, लाक्ष्मिकौर जुनी, प्रेमसिंग जुनी, उमेश मडावी, अनिल भोयर, प्रभाकर हारगोडे, जावेदखा पठाण, शंकर महाजन, रिंगदेव कलोडे, गजानन कडूकर, गोविंदा चौधरी, अंकुश वांढरे, मोतीराम आष्टनकर, श्रावण राउत, सुवर्णा हरणे, दर्शन बबन फाटे, राजू कातडे, राजू आत्राम, विजय तेलतुंबडे, कलावती ढेंगरे, कमलाबाई उगे, रुखमा झाडे, विजय घोडमारे ई. मोठय संख्येने लाभार्थी निवेदन देतांना हजर होते.