गोंडपीपरी तालुक्यातील दरूर येथे सर्पमित्रा कडून नागास जीवदान* *दरूर येथील घटना*

54

*गोंडपीपरी तालुक्यातील दरूर येथे सर्पमित्रा कडून नागास जीवदान*

*दरूर येथील घटना*

गोंडपीपरी तालुक्यातील दरूर येथे सर्पमित्रा कडून नागास जीवदान*  *दरूर येथील घटना*
गोंडपीपरी तालुक्यातील दरूर येथे सर्पमित्रा कडून नागास जीवदान*
*दरूर येथील घटना*

 

राजू ( राजेंद्र ) झाडे

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी

मो नं 9518368177

 

गोंडपीपरी-तालुक्यातील दरूर येथील विनोद चिंचोलकर यांच्या घरात नाग साप आढळुन आला.

चिंचोलकर यांनी घरात नाग साप असल्याची माहिती सर्पमित्र पंकज नागापुरे, आशिक दुर्गे, यांना दिली असता त्यांनी मोठ्या शिताफीने नाग सापास पकडले आणि निसर्ग मुक्त केले.

नाग साप घरात एका

भिंतीलगत लपून बसला होता.साप बघुन चिंचोलकर कुटूंब घाबरले होते. लागलीच साप असल्याची माहिती सर्पमित्र नागपुरे, दुर्गे, यांना दिली असता ते घरी येऊन मोठ्या शिताफीने सापाला पकडताच चिंचोलकर कुटुंब समाधानी झाले.

हल्ली साप दिसताच मनात भीती निर्माण होते.. कित्येकांच्या मुखातून मारा त्याला असेच शब्द मुखातून बाहेर येतात .

मात्र सर्प मित्र नागापुरे साप दिसताच घाबरू नका, सापाला मारू नका , साप पर्यावरणाचा भाग आहेत असे सांगत नागरिकांत जनजागृती करीत आहेत.

उंदराचा पाठलाग करीत साप घरात आला असावा असा अंदाज सर्प मित्र नागपुरे. दुर्गे. यांनी व्यक्त केला..