गोंडपीपरी येथे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत धनादेशाचे वितरण.

गोंडपीपरी येथे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत धनादेशाचे वितरण.

गोंडपीपरी येथे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत धनादेशाचे वितरण.
गोंडपीपरी येथे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत धनादेशाचे वितरण.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या अनुमतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष शेखर धोटे यांच्या हस्ते शेतकरी कल्याण निधी अंतर्गत लाभार्थींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी मयत मारुती चौधरी यांच्या पत्नी नीता चौधरी यांना रुपये दहा हजार चा धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच मयत रेखा अरुण गुगळे यांचा रुपये दहा हजाराचा धनादेश पती अरुण घुबळे यांच्या सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी वेडगावचे सरपंच धीरेंद्र नागापुरे, माजी सरपंच प्रकाश मडावी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विनोद नागापुरे, दिलीप धुडसे, अशोक राऊत, दिलीप कोसरे, रतन जाळे, बंडू उमक, समीर किरमिरे, दीपक डोंगरे तसेच जिल्हा बँकेचे प्रतिनिधी केशव वडे स्टॉप ऑफिसर उपस्थित होते.