विठ्ठलवाड्यातील ” नेतागीरी ” चा सामान्यांना फटका*

55

*विठ्ठलवाड्यातील ” नेतागीरी ” चा सामान्यांना फटका*

विठ्ठलवाड्यातील ” नेतागीरी ” चा सामान्यांना फटका*
विठ्ठलवाड्यातील ” नेतागीरी ” चा सामान्यांना फटका*

 

राजू ( राजेंद्र ) झाडे

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी

  • मो नं 9518368177

गोंडपीपरी:-नेतागीरी करायला हवी,मात्र नको तिथे नेतागीरी केली की तोंडघशी पडण्याची वेळ ओढावते.अशीच वेळ विठ्ठलवाड्यातील नेत्यांवर ओढावली.सामान्य नागरिक रांगेत उभे असतांना नेतागीरीचा वापर करून लस टोचणार्या नेत्यांवर गावकरी आगपाखड करित आहेत.

झाले असे, गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथिल जिल्ह्य परिषद उच्च प्रा.शाळा येथे शुक्रवारला कोविड लसीकरनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरवारच्या रात्रौ लसिकरणाला उपस्थित रहा,असे दवंडीने गावात सांगण्यात आले.

कामे बाजुला सारून लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली. लसिकरणासाठी गावकरी रांगेत उभे झाले.आपला नंबर लागणार,याची रांगेत उभे राहून वाट बघत असलेल्या गावकर्यांना डावलून नेत्यांनी,त्यांचा कुटूंबातील सदस्यानी लच टोचली.नेते म्हणून यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत काय ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.अधिकार्यांनीही नेत्यांचीच बाजू घेतली.या प्रकाराने नाराज झालेल्यांनी लस न घेताच घराचा रस्ता पकडला. लसिकरणाला उपस्थित असलेले विठ्ठलवाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शांताराम आलांम यांनी हा प्रकार बघीतला.या प्रकाराची त्यांनी निंदा केली.ज्या सामान्य माणसांमुळे तुम्हची नेतागीरी चालते,त्यांना असे डावलने संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले.