शिवसेना युवासेनेच्या वतिने दारोडा टोल नाका येथील व्यवस्थापक यांना निवेदन.

शिवसेना युवासेनेच्या वतिने दारोडा टोल नाका येथील व्यवस्थापक यांना निवेदन.

शिवसेना युवासेनेच्या वतिने दारोडा टोल नाका येथील व्यवस्थापक यांना निवेदन.
शिवसेना युवासेनेच्या वतिने दारोडा टोल नाका येथील व्यवस्थापक यांना निवेदन.

 

✒️मुकेश चौधरी✒️
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
हिंगणघाट:- तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वर खड्डे पडल्या गेले व जो पर्यंत रोड चे काम निट होत नाही तो पर्यंत वाहन चालक यांच्या कडुन कर न घेण्यात यावा तसेच 20 कि.मी.अंतराच्या आतील वाहन धारका कडुन कर न घेण्याबाबत शिवसेना तर्फे निवेदन देण्यात आले.

शिवसेना युवासेना पोहणा व वडनेर सर्कल च्या वतिने दारोडा येथील टोल नाका येथील व्यवस्थापक यादव यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग हा पुर्ण खड्डे मय झाला आहे. दर पावसाळ्यात या मार्गाने वाहन चालवणे कठीण झाले आहे. अपघाताचे प्रमाण हे खुप वाढत असल्या मुळे वाहन चालक यांच्या मध्ये भिती निर्माण झाली आहे. बोपापुर ते दारोडा या रोड व खुप मोठे खड्डे पडले आहे. रात्रीच्या वेळी वाहन कसे चालवावे कळे नासे झाले आहे. तरी टोल च्या माध्यमातुन तात्काळ खड्डे बुजवण्यात यावे व ज्या गावा पासुन रोड वर खड्डे आहे पोहणा ते दारोडा वाहन चालका कडुन टोल न घ्यावा असे टोल व्यवस्थापक यादव यांना विनंती केली आहे. तसेच स्थानीक युवकांना टोल वर कामा करीता आधी त्यांना प्राधन्य द्यावे होत करु मुलांना कामाची गरज असल्या मुळे त्यांना मधुनच कामा वरुण काढुन न टाकावे व 20 कि.मी. वरील येणार्या ग्रामीण भागातील वाहन चालका कडुन टोल न घेण्यात यावा. तसेच त्यांना मासीक पास योग्य ते नुसार उपलब्ध करुण देण्यात यावी.टोल नाका येथील काही पथ दिवे बंद असल्या मुळे ते त्वरीत सुरु करण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवसेना तालुका प्रमुख निखील वाघ, शिवसेना माजी तालुका प्रमुख अभय वानखेडे,शिवसेना वडनेर सर्कल प्रमुख सुधाकर डंभारे, शिवसेना पोहणा सर्कल प्रमुख जगदीश घुगरे, शिवसेना वडनेर सर्कल संघटक मंगेश भोयर, पोहणा उपसर्कल संघटक मोहण पडवे,’युवसेना वडनेर सर्कल प्रमुख निखील सुपारे, पोहणा सर्कल युवासेना उपसर्कल संघटक निखील कोल्हे व समस्त शिवसैनिक उपस्थीत होते.