ज्येष्ठांचा अनुभव आयुष्यात प्रगती करण्यासाठी आवश्यक: डॉ.मंगेश गुलवाडे
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

✒️हेमा मेश्राम✒️
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
73919 36394
चंद्रपूर : –भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 1 ऑक्टोबर ला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की आयुष्यात जर व्यक्तीला प्रगती साधायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव फार महत्त्वाचा असून त्यांच्या अनुभवाच्या आधारेच व्यक्तीच्या व्यक्ती महत्वाचा विकास होऊ शकतो असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमात महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, रवि लोणकर, उमेश अष्टणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर सदर सत्कार कार्यक्रमात विश्रांती ज्येष्ठ नागरिक संघ नेहरू नगरचे अध्यक्ष किसन झाडे,उपाध्यक्ष धनराज चौधरी, सचिव नीलकंठ येरमे, कोषाध्यक्ष नामदेव तडस, सल्लागार लक्ष्मण सावरकर, बंडू पेंदाम, संचालक सुनील रहाटे, सदस्य तुळशीराम सोमलकर, डोमा पाटील, प्रभाकर नगराळे, शालीक कुडे, सुभाष चौधरी, महादेव राजूरकर यांचा सत्कार करण्यात आला.