चंद्रपुर वाहतूक अपघात तपास प्रकरणे मध्ये पोलिसांची कामगिरी संशयस्पद : राजु शंकरराव कुडे, शहर सचिव आप

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
Mob… 9834024045
चंद्रपूर:- शहरात मागील काही दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातातील संबधित आरोपी पोलीस तपासा नंतर सुध्दा मिळत नसल्याने जनतेच्या मनातून पोलीस प्रशासनावरील विश्वास उठत चाललेला आहे.
मागील काही दिवसाअगोदर बाबुपेठ येथे दोन वेगवेगळया अपघातात दोन व्यक्ती चा मृत्यू झाला ज्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता, दोन आठवडे ओलठून सुध्दा संबंधित आरोपीचा शोध लागलेला नाही.
एका प्रकरणात अपघात होताना घटना स्थळावरील ट्रॅक्टर शोरुमच्या सीसीटीव्ही कॅमेरेत चित्र कैद असून वाहन क्रमांक दिसत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे मृतकाचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असून सुध्दा आरोपीचा शोध न लागणे हे खुप मोठी शोकांतिका असुन पोलिसांच्या कामगिरी वर प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याचे आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींचा जाब विचारायला आणि पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणण्याकरिता आम आदमी पार्टी बाबुपेठचं शिष्ट मंडळ पोलीस अधिक्षक यांना भेटून निवेदन देण्यात आले.
यावेळेला आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे, बाबुपेठ प्रभाग महिला संयोजिका श्रीमती सुजाता ताई बोदेले, पिढीत परिवारातील सदस्य सुमित रायपूरे, निखिल बारसागडे, जयदेव देवगडे, चंदु माडूरवार, सुखदेव दारुनडे, प्रविण चूनारकर, जयंत थूल, बाबाराव खडसे, सय्यद अश्रफ, अंजू रामटेके, ऐश्वर्या वासनिक, शंकर नीखाडे, कालिदास ओरके, शैलेश सोणकुसरे, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.