10 ऑक्टोंबर रोजी राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवसी रक्तदान शिबिर आयोजित.
त्यानिमित्ताने या दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन.

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- येथे राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस साजरा करण्या संदर्भात गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली.
कोरोणाच्या दोन लाट ओसरल्यानंतर येणाऱ्या तिसरा लाटाची शक्यता लक्षात घेऊन देशातील रुग्णांना नवजीवन मिळण्याकरिता रक्ताची गरज आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणूनच आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर घ्यायचे यावर उपस्थित सर्व मान्यवरांकडून एकमत झाले. जास्तीत जास्त रक्त दात्यांनी 10 ऑक्टोंबर रोजी शिबिरात येऊन रक्तदान करावे असे आवाहन सुध्दा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले. याकरिता गावागावांतील कार्यकर्त्यांनी कामाला लागा अश्या सूचना सुध्धा पक्षाकडून देण्यात आल्या.
बैठकीला सुरेश काका चौधरी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तुकाराम झाडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, रेखा रामटेके तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, देवेंद्र बट्टे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी, शंभू येल्लेकर ज्येष्ठ नेते काँग्रेस, राजिवसिंह चंदेल माजी तालुका अध्यक्ष,संतोष बंडावार तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस, विनोद नागपुरे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना कुंदा कोंडेकर पोडसा यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती.