शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा: शिवसेना तर्फे निवेदन.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा: शिवसेना तर्फे निवेदन.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा: शिवसेना तर्फे निवेदन.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

बल्लारपूर:- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, बल्लारपुर शिवेसेनाचे श्री. सिक्कीभैय्या यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाशभाऊ पाठक तालुका प्रमुख, बाबा शाहू शहर प्रमुख बल्लारपुर शिवसेना तसेच महिला आघाडीच्या सौ. कल्पनाताई गोरघाटे महिला उप जिल्हाप्रमुख व मीनाक्षीताई गलघट यांच्या प्रमुख उपस्थितीत, अधिवक्ता प्रणय भाऊ काकडे शहर समन्वयक बल्लारपुर शिवसेना यांच्या नेतृत्वात शिवसेना तर्फे उप मुख्याधिकारी जयवंत कातकर याना मोकाट फिरणाऱ्या कुत्रांनाचा बंदोबस्त करण्यास निवेदन देण्यात आले.

आज शहरात या मोकाट फिरणाऱ्या कुत्रांना त्वचा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि या विकारामुळे गल्ली बोंड्यात खेळणारे लहान मुले असुरक्षित आहे। त्या मुलांना हा रोग होण्याची जाणीव घेता प्रतिबंधात्मक उपचार गरजेचा भासुण बल्लारपुर शिवसेना तर्फे रोगाची रोकथाम करण्यास यथोचित उपचार करण्यास विनंती करण्यात आली. निवेदन सादर करताना शेख युसूफ उप शहर प्रमुख व अनुदान योजना समिती सदस्य बल्लारपुर, सोनु श्रीवास, डंबारे, बॉबी कादासी, संतोष दीक्षित तसेच इतर कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.