सावधान! बदलापुरात आढळला बिबट्याचा वावर

सावधान! बदलापुरात आढळला बिबट्याचा वावर

सावधान! बदलापुरात आढळला बिबट्याचा वावर
सावधान! बदलापुरात आढळला बिबट्याचा वावर

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422

बदलापूर : मुंबईजवळील बदलापूर शहरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच बदलापूर शहराजवळील कात्रप जंगलात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कात्रपच्या जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत.

बदलापूरच्या कात्रप जंगलात एका शेळी पालकाने हा बिबट्या बघितला. याच जंगल परिसरात बिबट्याने रविवारी शेळीवर देखील हल्ला केला. त्यानंतर वनविभागाने कात्रप जंगल परिसरात पंचनामा करत बिबट्याच्या पायांचे ठसे पुरावे म्हणून जमा केले आहेत. जंगलात बिबट्याचा वावर असल्याचा पुष्टी झाल्याने जंगलाच्या आसपासच्या विभागातील रहिवाश्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन नागरिकांना वनविभागाने केलं आहे.

तसेच पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. रात्री उघड्यावर कोणीही झोपू नये. बिबट्या दिसल्यास त्याला डिवचू नका आणि घाबरू नका. कोणत्याही वन्यप्राण्याने हल्ला केल्यास त्वरीत कळवावे, अशा सूचना वनविभागाने स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत.