चंद्रपूरसह राज्यातील २१ महापालिकांना बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर सविस्तर वृत्त या माहिती प्रमाणे आहे : महाराष्ट्रातील मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका मध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा निर्णय अलीकडे महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडी सरकारने घेतला होता त्यानुसार महापालिका च्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारीही राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे यासाठी मुंबई वगळता राज्यात सगळीकडे बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहे या संदर्भात राज्यातील निवडणूक आयोगाने ठाणे, नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईदर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, मालेगाव, परभणी, नाशिक, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, या महापालिकांच्या आयुक्तांना तातडीने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचं कार्य सुरू करावे तसेच कच्चा आराखडा तयार होताच याबाबत निवडणूक आयोगास कळवावे अशा प्रकारचे पत्र संबंधित आयुक्तास पाठविण्यास आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे महापालिकांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्यामुळं नवी-मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर महापालिकांची एक माहिती विश्वासनिय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे