घटस्थापनेच्या मुहूर्तावर नागपुर जिल्हातील मंदिराचे दार उघडलं.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- राज्यात कोरोना वायरसने हाहाकार माजवला होता त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मीक मंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील नागरिकांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
तब्बल दीड वर्षानंतर अखेर नागपूर मधील प्रसिद्ध टेकडी गणेश, दिशाभुमी, ड्रेगन पॉलेस टेम्पेल, कोरोडी आणि इतर धर्मीक स्थळी जाऊन जनतेला देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नागपुरातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.