गोंडवाना विद्यापीठाचा परिक्षेतील सगळा गोंधळ अजूनही सुरूच

गोंडवाना विद्यापीठाचा परिक्षेतील सगळा गोंधळ अजूनही सुरूच

गोंडवाना विद्यापीठाचा परिक्षेतील सगळा गोंधळ अजूनही सुरूच
गोंडवाना विद्यापीठाचा परिक्षेतील सगळा गोंधळ अजूनही सुरूच

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी

राजुरा : -राज्यातील सर्वात तरुण असलेले गोंडवाना विद्यापीठ आपल्या भोंगळ कारभाराने नेहमीच चर्चेत असते. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्यानंतर सुद्धा शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा विषय असो वा ऑनलाईन परीक्षा घेण्याचा गोंडवाना विद्यापीठ काही ना काही कारणामुळे चर्चेत व वादात असते.असाच नवा वाद आज पुन्हा एकदा समोर आला असुन विद्यापीठाच्या एल एल बी च्या तीन व पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सेमिस्टर च्या उन्हाळी 2021 च्या परिक्षा सुरू आहेत विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार आज सकाळी 10 वाजता परीक्षा घेण्यात येणार होती मात्र आता 11:15 वाजून गेले असले तरीही परीक्षा सुरू झालेली नाही. ह्या संदर्भात प्रा. चिताडे ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एक तासाने परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती दिली असुन तांत्रिक कारणामुळे परीक्षा वेळेत सुरू होऊ शकली नसल्याचे त्यांनी कळविले आहे.ऑनलईन परीक्षा घेणे सुरू झाले त्यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेच्या सर्व्हर मधे वारंवार बिघाड व्हायचा परीक्षा लांबणीवर पडत होत्या मात्र ती सुरुवात असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच त्याकडे संयमित दृष्टीने बघुन दुर्लक्ष केले मात्र आता 2 वर्षात अनेक वेळा परीक्षा आयोजित करूनही गोंडवाना विद्यापीठाचे सर्व्हर नेहमीच नादुरुस्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमधे नाराजी व संताप दिसत असुन विद्यापीठाने तत्काळ उपाययोजना न केल्यास विद्यार्थी उद्रेक करू शकतात ह्याची जाणिव विद्यापीठाने ठेवावी असे मत विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहे.