नागपुर: गडामध्येच भाजपच पानीपत, नागपूर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.

नागपुर: गडामध्येच भाजपच पानीपत, नागपूर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.

नागपुर: गडामध्येच भाजपच पानीपत, नागपूर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.
नागपुर: गडामध्येच भाजपच पानीपत, नागपूर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.

युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर जिल्हातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा गड असलेला नागपुर जिल्हात कॉंग्रेसने सुरुंग लावला आहे. त्यामूळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये बीजेपीच पानीपत झाल्याचे निकाल समोर आले आहे.

काही महिन्या अगोदर देशातील सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले होते. नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या तगड्या भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर, मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागे साठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यात काँग्रेसने एका हाती 9 जागांवर विजय मिळवला तर भाजपाला फक्त 03 जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीनं कांग्रेसला 02 जागा आणि इतर उमेदवारांनी 02 जागा जिल्हा परिषदेत विजय मिळवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद बरोबर पंचायत समितीच्या 31 जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात आली. पंचायत समितीच्या या 31 जागांपैकी भारतिय जनता पार्टीला 06, राष्ट्रवादी काँग्रेसला 02 आणि काँग्रेसनं 21 जागांवर आणि 2 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पंचायत समितीत पण बीजेपी ला मोठा मानहानीकारक पराभवाला समोर जाव लागले.

नागपूरमधील जिल्हा परिषदेच्या 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदारांनी परवा आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी भारतिय जनता पक्षाचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी ताकदीनं उतरले होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रचाराची कमान सांभाळली तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. तर, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचाही मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. मात्र, निवडणूक निकालातून सुनील केदार यांनी विरोधकांना त्यांची ताकद दाखवून दिली आहे. नागपुर बीजेपीच्या गडात चारही मुंड्या चीत केल आहे.