*विहिरीतील पिण्याच्या दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात*
*गोजोली ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष*

*गोजोली ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:-सविस्तर वृत्त असे की गोंडपिपरी तालुक्यातील चेक गोजोली येथील सार्वजनिक विहिरीत दुषित पाणी पहायला मिळाले. दुषित पाण्याच्या सेवनाने येथील नागरिकांना अत्यंत वाईट परिणामाला सामोरे जावे लागत आहे.पावसाचे दिवस आणि उष्ण तापमानात वाढ होत असल्याने गावात आधीच साथीचे रोग उत्पन्न होत आहे.अश्यात दुषित पाण्याच्या सेवनाने डायरीया,अतिसार या सारख्या आजाराचे विकार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या खेरीज किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. विहिरीत चिला तयार झाला असून पाण्याचा दुर्गंध येत आहे.ग्राम पंचायत नागरिकांच्या बाबत किती सजग आहे यावरून दिसून येते.
जमिनीच्या आतील पाण्याची पातळी अनेकदा खोल जाऊन त्यावर प्रदूषकांचा परिणाम पाण्यावर होतो. भूमिगत पाण्यावर ज्यांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत अवलंबून आहे त्यांना या पाण्यातून विविध प्रकारच्या संसर्गाना सामोरे जावे लागते.या बाबत लेखी तक्रारी करुन ही प्रशासन कोणतीच दखल घेत नाही.माणसा प्रमाणेच इतर प्राण्यांनासुद्धा शुद्ध पाण्याची गरज असते.गाय,बैल हे किंवा इतर कोणतेही प्राणी पाण्यावर विविध प्रक्रिया करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जे पाणी मिळेल तेच पाणी पिऊन त्याची तहान भागवतात, परिणामी दूषित पाण्यामुळे जनावरे होणाऱ्या रोगांना बळी पडुन मृत्यु पावतात.असे स्थानिकांचे मत आहे.परिसरातील विहिरीत दुषित पाणी येत असल्याने विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असून आरोग्यास हानिकारक आहे. सरपंच व सचिव हे गावातील समाष्यान बद्दल इतके अनभिज्ञ कसे.? असे माजी ग्राम पंचायत सदस्य नत्थूलाल डोंगरे यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे.