*रेपनपल्ली ते सिरोंचा रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ*
आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नारळ फोडले

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नारळ फोडले
मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.९४०५७२०५९३
*अहेरी:-* आलापल्ली ते सिरोंचा रोडची मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त व भयावह परिस्थिती झाली असून पहिल्या टप्प्यात रेपनपल्ली ते सिरोंचा रोडच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाले. मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नारळ फोडून विधिवत पूजन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, रा.काँ.चे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, रेपनपल्लीचे माजी सरपंच लक्ष्मण येल्लम, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता सारंग गोगटे, कनिष्ठ अभियंता आशिष घानमोडे, माजी पं. स.सदस्य राकेश पनेला, मांतय्या आत्राम,इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची मोठी बिकट अवस्था झाली असून मोठं-मोठ्या खड्यांमुळे रस्त्यावरून दुचाकी वाहनाने प्रवास करणेही कठीण झाले आहे. सिरोंचा वासीय व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सदर रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाल्याने केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर केले असून पहिल्या टप्प्यात रेपनपल्ली ते सिरोंचा रस्त्याची दुरुस्ती होणार असून लवकरच आलापल्ली ते रेपनपल्ली पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखविले.
सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने रेपनपल्ली आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी रस्त्याची समस्या सुटणार असल्याने आनंद व्यक्त केले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले आहे.
यावेळी संतोष बोमन्नवार, जगदीश जुमळे, सुरेश येल्लम, श्रीधर सडमेक, राकेश तलांडे, दिवाकर येल्लम, नामदेव पेंदाम, गोसाई पेंदाम, समय्या सिडाम, समय्या मडावी आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
*बॉक्स*
*लवकरच आलापल्ली ते रेपनपल्ली कामाला सुरुवात होणार!*
बहुचर्चित आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे मार्ग सुलभ व सुकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्षात भेटी घेऊन व पाठपुरावा करून कामाला मंजुरी व भरीव निधी उपलब्ध करून घेण्यात आले असून रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाचे तांत्रिक अडचणी येत आहे यासाठी राज्याचे वनमंत्री ना.दत्तात्रय भरणे व वन विभागाचे वरिष्ठअधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच प्रत्यक्षात भेटी घेऊन तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आपले युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच आलापल्ली ते रेपनपल्ली मार्गाच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले.