मिडिया वार्ता न्युज तर्फे नव रात्रीच्या मांगल्याचे नवस्वरुप नवदुर्गांपैकी द्वितीय ब्रह्मचारिणीचे महात्म्य.

मिडिया वार्ता न्युज तर्फे नव रात्रीच्या मांगल्याचे नवस्वरुप नवदुर्गांपैकी द्वितीय ब्रह्मचारिणीचे महात्म्य.

मिडिया वार्ता न्युज तर्फे नव रात्रीच्या मांगल्याचे नवस्वरुप नवदुर्गांपैकी द्वितीय ब्रह्मचारिणीचे महात्म्य.
मिडिया वार्ता न्युज तर्फे नव रात्रीच्या मांगल्याचे नवस्वरुप नवदुर्गांपैकी द्वितीय ब्रह्मचारिणीचे महात्म्य.

मिडिया वार्ता न्युज
देवी ब्रह्मचारिणी:- काल पासुन पवित्र पावन अशा नवरात्रीला सुरवात झाली, अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्राचे महापर्व, महोत्सव सुरु झाला आणि दसरा पर्यंत हे सुरु असते. गुरुवार, 07 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सन 2021 मधील नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने, आनंदाने साजरा केला जात आहे. नवदुर्गेच्या नऊरुपांचे नवरात्रात पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करुन आप आपल्या परिने श्रद्धापूर्वक आपल जिवनातील मनोकामना पुर्ण करत आहे. नवरात्रातील आज दुसरा दिवस असून, नवदुर्गेचे दुत्तीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीचे महत्त्व, महात्म्य यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

प्रसिद्ध नवदुर्गेचे दुसरे रूप म्हणुन ‘ब्रह्मचारिणी’ या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पवित्र द्वितीय दुर्गा आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते. आणि देवी आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पुर्ण करते.

सूर्योदयापूर्वी उठून आपले नित्यकर्म केल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे भक्ती भावाने षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे –

या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा!!

आदी नवशक्तीपैकी महामाया ‘ब्रम्हचारिणी’ हे दुर्गेच्या द्वितीय स्वरुप रूप आहे. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी महामाया आहे. मंगलकारक अशा नवरात्रच्या दुसर्‍या दिवशी या देवीचो पूजा अर्चना केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन ‘स्वाधिष्ठान’ चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.

ब्रह्मचारिणी ही पतित पावन अशी देवी आहे. ब्रह्मचारिणी हिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍र‍िणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.

ब्रह्मचारिणी हिने एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी ‘उमा’ अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे ‘उमा’ हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की ‘हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पत‍ी रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर त्यांनी दिला.

ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे मा दुर्गेचे दुसरे रूप आहे. म्हणून नवदुर्गांपैकी द्वितीय स्वरुप देवी ब्रह्मचारिणी दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.