मुंबई विमानतळावर अलोट गर्दी, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी परस्थिती.

✒ संदीप साळवे ✒
मुंबई प्रतिनिधी
मो. न. 87794 43497
मुंबई :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गर्दी बघायला मिळाली. या प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी परस्थिती निर्माण झाली. याच्या मुळे अनेक प्रवाशांना झटका बसला असून 30 पेक्षा जास्त प्रवाशांची फ्लाईट मिस झाली असल्याचे समोर येत आहे.
कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र आहे. त्यामूळे कोरोनाच्या निर्बंधांत शिथिलत देण्यात येऊन लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळेच हवाई सफर करणा-याचा संख्येत माघील अनेक दिवसांपासुन वाढ होत आहे. परिणामी मुंबईतील विमानतळांवर गर्दी होताना बघायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर या गर्दीने कळसच गाठला आहे. त्यात भर म्हणजे विमानतळाचे प्रवेशद्वार आणि चेक इन काउंटरवर कमी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने लांबलचक रांगा लागल्या. हळूहळू या रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली, तरी प्रवाशांना आत प्रवेश मिळत नव्हता.
त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. काही जणांनी तर ‘क्यू लॉक’ तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान 6E5731 हे विमान मुंबई हैदराबाद नियोजित होते. परंतु, 15 हून अधिक प्रवाशांना वेळेआधी पोहोचता न आल्याने त्यांना न घेताच विमान निघून गेले. अन्य 15 ते 20 प्रवाशांसोबतही असाच प्रकार घडला. त्यामुळे गोंधळलेल्या प्रवाशांनी धावाधाव सुरू केली. त्यामुळे काहीकाळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.
विमानांना लेटमार्कया अनागोंदी कारभाराचा फटका प्रवाशांसह विमान सेवेलाही बसला. प्रवाशांचे चेकइन वेळेत पूर्ण होत नसल्याने नियोजित विमाने 30 ते 45 मिनिटे उशिराने उड्डाण घेत होती.