व्हाट्सएप ग्रुपवर मटका जुगार चालविणारी टोळी जेरबंद ; ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त*

58

*व्हाट्सएप ग्रुपवर मटका जुगार चालविणारी टोळी जेरबंद ; ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त*

*भोसरी,पुणे* – अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट एकने भोसरी येथे व्हॉट्सअप ग्रुपवर मटका जुगार चालविणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यात पोलिसांनी ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इंद्रजीत जर्नाधन भोईर (वय ३२, रा. सावंतनगर, आळंदी रोड, पुणे), पवन चुडामन ठोकर (वय ४०, रा. बौध्दनगर, पिंपरी पुणे), स्वप्नील रामेश्वर कदम (वय २१, रा. काळेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहरातील अवैद्य धंदे रोखण्यासाठी मोहीम उघडली आहे.

त्या अनुशंगाने गस्त घालत असताना भोसरी, एमआयडीसी परिसरात पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, शांतीनगर, भोसरी येथील हॉटेल मयुरेशचे मालक इद्रजीत भोईर हा त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपच्या माध्यमातुन मटका घेत आहे.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी हॉटेल मयुरेश येथे छापा टाकला. तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी पकडण्यात आले. त्यांचे मोबाईल तपासले असता ते तिघेही त्यांच्या मोबाईल वरून व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर ओळखीच्या लोकांकडून मटका जुगार घेत असल्याचे उडघ झाले.

त्यांच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांची रोकड, ३ मोबाईल फोन, हिशोबाच्या वह्या असा ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्या विरोधात मुंबई जुगार ॲक्ट नुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे वेगवेगळ्या भागामध्ये राहण्यास आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलवर प्रत्येकाचे स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये ओळखीच्या लोकांना समाविष्ट करून त्यामार्फत मटका जुगार घेत होते.