महाराष्ट्र बंद च्या समर्थनात हिगणा येथे महाविकास आघाडीचे निदर्शने.

57

महाराष्ट्र बंद च्या समर्थनात हिगणा येथे महाविकास आघाडीचे निदर्शने.

●बाबा आष्टणकर यांचे नेतृत्व तहसीलदार यांना निवेदन.
●हिंगण्यात बंदला संमिश्र प्रतिसाद.

महाराष्ट्र बंद च्या समर्थनात हिगणा येथे महाविकास आघाडीचे निदर्शने.
महाराष्ट्र बंद च्या समर्थनात हिगणा येथे महाविकास आघाडीचे निदर्शने.

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
 9822917104

हिंगणा:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाने गाडी चढवून चार निष्पाप शेतकऱ्यांची अमानुषपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत हिंगणा तालुक्यात महाविकस आघाडीच्या वतीने हिंगणा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंगणा अशी पाच किलोमीटर बाईक रॅली काढून बंदला समर्थन दिले. बाईक रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. रॅलीचे समारोप छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आला. व उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील हिंसाचारातील दोषींवर केंद्र सरकारने त्वरित कारवाई करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार हिंगणा यांचेमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आले हिंगणा तालुक्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हा परिषद चे माजी सत्ता पक्ष नेते बाबा आष्टणकर राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, जि.प.सदस्य रश्मीताई कोटगुले, जि.प. सदस्य संजय जगताप, राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवी जोडांगळे माजी सभापती बबनराव आव्हाळे, अशोक पुनवटकर, प.स. सदस्य सुनील बोंदाडे,आकाश रंगारी उमेश राजपूत, राजेंद्र उईके, रूपाली खाडे, सुशील मिश्रा, प्रदीप कोटगुले, भीमराव कडू, लीलाधर दाभे, गुणवंता चामाटे, प्रवीण घोडे, युवराज पुंड, राहुल पांडे, लक्ष्मण रडके, अरुण विधाते, फिरोज शेख, विजू डाहाके,जितू यादव, दिनेश भुते, समाधान माने, उमेश ससाने, नीरज पयासी, भवानी शर्मा, शैलेश रॉय, तानेश्वर चौधरी, लखन सिंग, अतिश गोंड, सोनू पांडे, संजय बागडे, आकाश गिरी, मनीष तिवारी, अमन बाविस्कर, विजय चौधरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.