बीड जिल्ह्यातील पोलीसाचा गुंडा राज, युवकाला मारहान.

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड :- मोठ्या अधिकारपदावर असलेली व्यक्ती पैशाच्या तालावर कसं नाचते याच ज्वलंत उदाहरण “राजा”कडे पाहिल्यानंतर लक्षात येऊ लागला आहे. गुंड माफियांची हुजरेगिरी करणाऱ्या या अधिकाऱ्याचा वचक संपला आहे. गुंडांच मीठ खाऊन गुंडांसारख वागण्याची प्रवृत्ती पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढू लागली आहे. चकलांबा येथे बेवड्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या शेंबड्या पोराच्या सांगण्यावरून पुजाऱ्याला बदडून काढले. “राजा ” ने “रामा”च्या भक्ताच्या मारहाण प्रकरणावर पांघरूण घालण्यात आपलं स्वामित्व सिद्ध केलं. आता चार पाच ट्रॅफिक हवालदारांनी रविवारी रात्री दूध घेऊन जाण्यासाठी आलेल्या एकाला भर चौकात बेदम मारहाण केली.त्याला रिक्षातून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले तेथे देखील मारहाण केली. तो बेवडा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. तेथे आपले हितसंबंध पणाला लावण्याचा त्यांनी अपयशी प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्यानंतर एस पी कडे केलेली तक्रार वापस घ्यावी म्हणून पुन्हा त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अशी प्रकरणं घडत असल्यामुळे राजा ला तर लाज राहिली नाही पण पालक मंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्रालयाची इज्जत मात्र रोज वेशीला टांगली जाऊ लागली आहे.
पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण अर्जुनराव काळे असून रविवारी रात्री नगर रोडवरील पोलिस पेट्रोल पंप येथे कार क्र.-एम.एच.01 ए.एल.2648 घेऊन दुध आणण्यासाठी गेला होता. तो तेथे कार रोडच्या बाजूला लावून दुध घेण्यासाठी उतरला. त्यावेळी ट्राफिक पोलिस जावळे व इतर तीन कर्मचारी तेथे आले व त्यांनी कार येथे का लावली म्हणून प्रविणला विचारणा केली. त्यावेळी प्रविणने त्यांना कार रोडच्या बाजूला असल्याचे सांगितले. कागदपत्रांची तपासणी केली मात्र ट्राफिक पोलिसांनी 500 रुपयांची मागणी केली. पण प्रवीण ने पैसे देण्यास इन्कार केला. यावेळी ट्रॅफिक पोलिस कार चा फोटो काढून शिवाजी चौकाकडे निघून गेले. काही वेळातच प्रवीणला बाराशे रुपये चा ऑनलाइन दंडाचा मेसेज आला. अर्धा एक तासानंतर प्रवीण हा शिवाजी चौकामध्ये गेला. यावेळी माझी चूक नसताना बाराशे रुपयांचा दंड का टाकला अशी विचारणा ट्रॅफिक पोलिसांना केली. 500 रुपये मागितले तर तू दिले नाहीस आता बाराशे रुपये दंड भर असा उत्तर पोलिसांकडून मिळालं. तुम्ही कायद्याचा गैरवापर करत आहात असं म्हणताच जावळे व इतर तीन कर्मचाऱ्यांनी प्रविण ला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुटका करून घेण्यासाठी प्रवीण ने पळ काढला असता लाथाबुक्क्यांनी बेदम पणे तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत प्रविण च्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून मुकामार देण्यात आला आहे.विशेष म्हणजे हे चारही कर्मचारी हारामच्या पैशाची दारू ढोसून नशेत तर्र होते. त्यानंतर त्याला रिक्षात घालून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. तेथेदेखील त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी व प्रवीण पिलेला असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याला सरकारी दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्यात आलं.पोलिस कर्मचाऱ्यांनी लँबमधील अल्कोहोल तपासणी करणारास 500 रुपये देऊन निघून गेले. मात्र याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आल्यानंतर तक्रार मागे घे अन्यथा परिणामांना सामोरं जा अशी धमकी देत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
झालेला प्रकार सीसीटीव्हीत कैद
मारहाण झाल्याचा प्रकार छ.शिवाजी महाराज चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील फुटेजमध्ये नक्कीच आढळून येईल याची तपासणी करून आरोपी पोलिस कर्मचाऱ्यां विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवीण काळे यांनी पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. आता या प्रकरणानंतर राजा रामास्वामी आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हरमखोर पणा वर पांघरूण घालतात की कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजाच्या काळात मात्र खाकीची इज्जत वेशीला टांगली गेली असल्याचं पहायला मिळत आहे.