महाज्योतिची महादीरंगाई..! पीएचडी शिष्यवृत्ती प्रक्रियेवरती भोंगळ कारभारामुळे महाज्योतीचे घोडे पुढेच जाईना.

50

महाज्योतिची महादीरंगाई..! पीएचडी शिष्यवृत्ती प्रक्रियेवरती भोंगळ कारभारामुळे महाज्योतीचे घोडे पुढेच जाईना.

महाज्योतिची महादीरंगाई..! पीएचडी शिष्यवृत्ती प्रक्रियेवरती भोंगळ कारभारामुळे महाज्योतीचे घोडे पुढेच जाईना.
महाज्योतिची महादीरंगाई..! पीएचडी शिष्यवृत्ती प्रक्रियेवरती भोंगळ कारभारामुळे महाज्योतीचे घोडे पुढेच जाईना.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

वर्धा:- महाराष्ट्र शासनाने मागास प्रवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (महाज्योति) स्थापना सारथी आणि बार्टी या संस्थांच्या धर्तीवर २०१९ मध्ये झाली आहे. महाज्योती संस्थेमार्फत विविध बाबींसाठी अधिकृत जाहिरात काढून संशोधक विद्यार्थ्यांसाठी निधी किंवा अधिछात्रवृत्ती मंजूर केली जाते. महाज्योतीच्या २०१९ च्या स्थापनेनंतर नुसताच घोषणांचा पाऊस झाला; परंतु सुरळीतपना नसल्यामुळे अंमलबजावनी मात्र अद्यापपर्यंत झाली नाही.

पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने स्थापन झालेल्या महाज्योतीच्या अत्यंत खराब कार्यालयीन प्रक्रियेमुळे तसेच कुठल्याही प्रकारचे वेळेचे नियंत्रण न ठेवता काम करण्याच्या पद्धतीमुळे आज पीएचडी छात्रवृत्ति जाहिरात एप्रिल २०१९ मध्ये निघून सहा सात महिने व कागदपत्र छाननी होऊन एक महिना झालेला असूनसुद्धा महाज्योती कडून विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जात नाही ही खरी तर दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती संस्था व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ढिसाळ कामांमुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

राज्यात सारथी बार्टी या संस्था सुद्धा पीएचडी विद्यार्थ्यांना दरवर्षी छात्रवृत्ति देऊ करतात ती सर्व प्रक्रिया वेळेवर आणि नियमांना धरून ठराविक वेळेत पार पडत असतात. पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना छात्रवृत्तिची अत्यंत गरज आहे कारण संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक खर्च जास्त असून त्यांना संशोधनाच्या कामासाठी आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी प्रयत्न न करता महाज्योती तील अनियंत्रित रटाळ व प्रत्येक कामामध्ये वेळखाऊ प्रक्रिया यामुळे नाहक संशोधन विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कागदपत्रे छाननी प्रक्रिया होऊन एक महिना उलटला असून अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली नाही पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे वारंवार मागणी करूनही संचालक मंडळ डॉ. वडले, डॉ. गमे आणि डॉ. तायवडे साहेब फक्त निष्क्रिय आणि टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. महाराष्ट्रातील सर्व पीएचडी विद्यार्थ्यांकडून लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून अवार्ड लेटर देण्याची मागणी होत आहे आणि जर ही मागणी गांभीर्याने घेतली नाही आणि पीएचडी विद्यार्थ्यांच्या मागण्या दुर्लक्षित केल्यास विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल तसेच येत्या 13 ऑक्टोबरपासून महाज्योती ऑफिस नागपूर व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ऑफिस पुढे आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आलेले आहे. महाज्योतीचा ढिसाळ कारभारामुळे व कागदपतत्रा जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत च्या करोना चा प्रभावामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती ची अत्यंत आवश्यकता आहे परंतु महाज्योती चे नेहमी करण दिरंगाई करत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वरील बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या खलील प्रमाणे

मागण्या आहेत:-
• अंतिम यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी.
• अवार्ड लेटर लवकरात लवकर देऊन पुढील प्रक्रिया तात्काळ करावी व बँक खाते उखडून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निधी द्यावा.