“कोविड नियमांचे पालन करत महात्मा फुले सहकारी संस्था मोवाडची आमसभा उत्साहात साजरी.

65

कोविड नियमांचे पालन करत महात्मा फुले सहकारी संस्था मोवाडची आमसभा उत्साहात साजरी.

"कोविड नियमांचे पालन करत महात्मा फुले सहकारी संस्था मोवाडची आमसभा उत्साहात साजरी.
कोविड नियमांचे पालन करत महात्मा फुले सहकारी संस्था मोवाडची आमसभा उत्साहात साजरी.

युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
मोवाड:- स्थानीक महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मोवाडची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत सामाजिक दुरी बाळगून व उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून संस्थेच्या सभामंडपात मर्यादीत सभासदांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.

या प्रसंगी संस्थेने 27 वर्षात केलेल्या प्रगतीचा व व्यवहाराचा आढावा सभासदांपुढे मांडण्यात आला या सभेला संस्थेचे अध्यक्ष धनराजजी देवघरे, उपाध्यक्ष राजेंद्र ढेपले व संचालक जगदीश वाडबुद्धे, मारोतराव मानकर, नीलकंठ कोरडे, प्रमोद हेडाऊ, अविनाश गजभिये, मनोज तरार, प्रदीप उज्जैनकर, गाडगे गुरुजी, प्रकाश पूरी, सौ देवकाबाई चापेकर, श्रीमती रेखाबाई नेरकर आदी उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष यादवराव घावडे व सुरेशजी खसारे उपस्थित होते.

विषयांचे वाचन व्यवस्थापक पुरुषोत्तम अवझेकर यांनी केले तर सभेचे सुत्र संचालन रितेश कोरडे यांनी करून उपस्थित सन्माननीय महोदयांचे आभार हर्षदा रमेशजी राजगुरु हिने मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी भालचंद्र ढोरे, गितेश कनिरे, केशव वालुलकर, विलास निमकर, रमेश खोपे आदींनी मदत केली.