सावनेर मध्ये कृषीदुतांकडून इ -पिक पाहणीचे प्रात्यक्षिक.

✒️अनिल अडकिने ✒️
सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं.9822724136
सावनेर,दि.12 ऑक्टोंबर:- सावनेर तालुक्यातील बोरुजवळा येथे शेतकऱ्यांना इ-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासंदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत कृषीदुताकडून इ-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आहे. तसेच पीक पेरांची नोंद करून देण्यात आली.
शेतकरी बांधवाना येणा-या अडचणी संदर्भात शेतकऱ्यांनी मोबाईलवर हा ॲप कसा हाताळावा, माहिती कशी भरावी, इ-पीक पाहणी करण्याचे फायदे व तोटे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.
यावेळी सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, प्रसन्नता तायडे, वैष्णवी महल्ले, स्वाती निकोसे तसेच पंजाबराव निंबाळकर, ईश्वर निंबाळकर, कैलास खंडे व इतर शेतकरी यांच्या उपस्थितीत इ-पीक पाहणीचे मार्गदर्शन करण्यात आले.