वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी काटोल येथे आंदोलन.

50

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी काटोल येथे आंदोलन.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी काटोल येथे आंदोलन.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी काटोल येथे आंदोलन.

✒️युवराज मेश्राम ✒️
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
काटोल:- वंचित बहुजन आघाडीचे वतीने उपविभागीय अधिकारी व कार्यकारी अभियंताच मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ऊर्जामंत्री, नगरविकास मंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

काटोल नरखेड विधान सभेच्या वतीने काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात नारे निदर्शने जोरदार घोषणाबाजी करून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर पालिकेचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले व तहसील कार्यालयावर व महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढुन मागण्यांचे निवेदन सादर केले.

== मागण्या ==
1.महाराष्ट्रात ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50हजार रु अनुदान दयावे. 2.शेतकऱ्यांच्या क्रुशिपंपासाठी आठ तासांसाठी लावलेले भारनियमन त्वरित थांबवावे
3.महानगर पालिका नगर पालिका मध्ये लागु केलेली प्रभाग पद्धती बंद करीन एक वार्ड एक नगरसेवक पद्धत चालु करावी
4.उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी या गावात शेतकऱ्यांवर गाडी चालवून अमानुषपने शेतकऱ्यांची हत्त्या करणारा मंत्री पुत्राला कडक शिक्षा करून ग्रुहराज्यमन्त्री पदावरून हकालपट्टी करून सहआरोपी करावे.
5.रोही डुकरांमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे त्या जनावरांचा बंदोबस्त करावा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी काटोल येथे आंदोलन.

या मागण्यांची पुर्तता सरकारनी करावी यासाठी तहसील कार्यालयावर व पावर हाऊस येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात मुख्य रस्त्यावर जोरदार निदर्शने करून आंदोलन करून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळेस दिगांबर डोंगरे यांनी जर कां शासनानी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जनतेला अधीकचा त्रास दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळेस काटोल तालुका अध्यक्ष देवीदासजी घायवट, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे तालुका अध्यक्ष जानरावजी गावंडे, काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे. ऑल इंडिया प्याँथर सेनेचे नरखेड तालुका अध्यक्ष शुभम गोन्डाने पारडसिंगा सर्कलचे निरीक्षक रामराव पाटील, सुनिल वरघट सर्कलचे अध्यक्ष दिनेश तायडे, येनवा सर्कलचे निरीक्षक बाबाराव गोन्डाने, प्रकाश निस्वादे, भिष्नुर सर्कलचे अध्यक्ष सुनिल नारनवरे, नंदकिशोर डबरासे, राजु सहारे, नीळकंठ गजभिये, विनायक ढोणे, प्रकाश देशभ्रतार, ओंकार मलवे, असलम शेख, दिपक गुडधे, शंकरराव काळभांडे, रवि सोमकुवर, सुनिल परतेती, सुरेशराव देशभ्रतार, मनोज गायकवाड, मंगेश पाटील, ध्न्यानेष्वर वाढिवे, दिनेश कौरती, पांडुरंग उईके यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.