डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीतून नव भारताची उभारणी.

लेखक – प्रशांत जगताप
9766445348
दीक्षाभूमी या पवित्र धम्म भुमिवर आल्यावर भीम अनुयायांना स्वाभिमानाचे जिवन जगण्याची एक नवी ऊर्जा प्राप्त होते. शरीरात वादळवा-या समान क्रांतीची फृर्ती प्राप्त होते. मनात मैत्री, करुणा आणि बंधूभावाचे भाव जागृत होतात. माणूस डोळस होतो. ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना नमन केले जाते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा अधिकार दिला. तर, धर्मांतराने नागरिकांना आपले जीवन सुखी, आनंदी आणि कल्याणकारी करण्याचा मार्ग दाखविला आहे याची जाणीव होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने जणु जगाला एक नवीन बुद्ध दिसून आला. त्यांनी केलेल्या अर्थिक परिश्रमातून आज हा भारत देश सुफलाम सुजलाम झाला आहे. त्याच्या या संविधानरुपी वटवृक्षातून आज देशात लोकशाही नादत आहे आणि भारतीय संविधानात तथागत बुद्धाचे प्राणीमात्रा साठी देण्यात आलेले मंगलमय विचार समानता, बंधूता, न्याय, अधिकार या पावावर संविधानाची चौकट उभी केली आहे.
31 मे 1936 रोजी नायगाव, मुंबई येथील ‘अखिल मुंबई इलाखा महार परिषद आयोजन करण्यात आली त्या परीषदेच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची तोफ या लाचारीमय अंधधर्माचा विरोधात दंद थोपवुन उभी राहली आणि ‘मुक्ति कोण पथे?’ या ग्रंथात सविस्तर पणे स्पष्ट केलेली आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जागतिक किर्तीचा बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूलभूत सिद्धांतांची अशी शिक्षा देतो. बौद्ध धम्मच माणसा माणसातील भेद, शोषण आणि विषमता थांबवू शकतो. बुद्धिप्रामाण्यवादी आणि समतावादी तत्त्वज्ञान असलेल्या बौद्ध धम्माचा पाया नैतिक आचरणावर उभा आहे. बुद्धाची शिकवण लोकशाहीवादी असून बौद्ध धम्म दु:खमुक्तीचा मार्ग आहे. बुद्ध म्हणतात, ‘मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे’. भारतातील हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली विषमतावादी समाजरचना म्हणजे एका समाजाला गुलाम बनवून त्याच्यावर अत्याचार करायला सांगते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही समाज रचना बदलून बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार सामाजिक पुनर्रचना करून नवसमाज निर्माण करावयाचा होता. म्हणूनच त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि अंधकारमय धार्मिक गुलामीला पायाखाली तुडवल.
आज धर्म ही अफूच्या गोळीचे काम करत आहे. आज धर्माचे अंधमय वाटचालीचा दिशेने प्रवास सुरु आहे. आज देशात धमिकतेच्या गुलामाची संख्या वाढत आहे. आज धर्मीक अत्याचाराचे मोठे उत आले आहे. हे भारताचा सारख्या लोकशाहीवादी, संविधानीक देशात खाईत नेण्याचे काम करण्यार आहे की काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
‘धर्म ही कपडे बदलण्याएवढी सोपी बाब नाही, तर ही मानसिकता बदल करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून धर्मांतराकडे चळवळ म्हणून पाहिले पाहिजे.’ धर्मांतरामुळे झालेले परिवर्तन एकांगी स्वरूपाचे नाही तर ते सामाजिक, धार्मिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी सर्वच क्षेत्रात आढळून येते. एवढेच नव्हे, तर धर्मांतरीत बौद्ध हे विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठतेने आणि तार्किकपणे विचार करतात, हे मानसिक परिवर्तन विलक्षण स्वरूपाचे आहे.
डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या या धम्मक्रांतीमुळे नागपूर शहर हे जगाच्या नकाशावर ‘बौद्ध क्रांतिस्थळ’ म्हणून झळकले. ‘दीक्षाभूमी’ या नावाने नागपूरला नवी ओळख प्राप्त झाली. दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आणि प्रेरणाभूमी ठरली. दीक्षाभूमी आज भारतीय जनतेच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक पर्यटनाचे क्षेत्र झाले आहे. दीक्षाभूमीवर कोणत्याही प्रकारचा पारलौकिक, आमिष, कर्मकांड होमहवन इ. निरर्थक बाबींना स्थान नाही. तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायी या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. या भूमीवर आल्यामुळे अनुयायांना स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा प्राप्त होते. मनात मैत्री, करुणा आणि बंधूभावाचे भाव जागृत होतात. माणूस डोळस होतो. ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना नमन केले जाते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभावरहित जीवन जगण्याचा अधिकार दिला. तर, धर्मांतराने नागरिकांना आपले जीवन सुखी, आनंदी आणि कल्याणकारी करण्याचा मार्ग दाखविला. डॉ. बाबासाहेब म्हणतात, ‘माझे जीवन व जगणे हाच माझा संदेश आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ते एक गतिमान तत्त्वज्ञान, मानवतावादी विचार आहे. या विचारावर, तत्त्वज्ञानावर चालणारे आपल्या जीवनात प्रगती करू शकतात. हा विश्वास त्यांना आहे म्हणूनच त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडून झाले. धर्मांतरामुळे माणसा-माणसातील जातीची बंधने आणि जातीयत्व शिथिल झाले. परिणामी इतर धर्मातील लोकांवरही त्याचा हळूहळू प्रभाव पडत आहे. अशाप्रकारे डॉ. आंबेडकरांचे धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होत आहे.
हजारो वर्षांच्या अन्याय-अत्याचाराचा बदला घेण्याचा दृष्ट हेतूने डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. धम्माच्या माध्यमातून देशातील जनतेत बंधुता, मैत्री भावना रुजविण्याचाच त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. भारत देश आणि भारतीय संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी भारतीय संस्कृती संवर्धित असलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपले राष्ट्रप्रेम सिद्ध केले. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराला राष्ट्रहिताचीच किनार लाभलेली आहे, हे स्पष्ट होते. धम्मदीक्षा देताना बाबासाहेब म्हणतात, मी भारतातील मूळ संस्कृतीशी अस्पृश्यांची नाळ जोडली असून जगातील बौद्धांशी बंधुत्वाचे नाते जोडून दिले आहे. अलीकडे भारतातील जनतेच्या मनात एकमेकांविषयी द्वेष भावना वाढत आहे आणि त्यामुळेच देशाला बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री भावनेची आवश्यकता आहे. याचा विचार प्रत्येक भारतीयांनी करणे गरजेचे वाटते.