धक्कादायक! सासऱ्याने सुनेवर शस्त्राने वार केल्यानंतर केली आत्महत्या

46

धक्कादायक! सासऱ्याने सुनेवर शस्त्राने वार केल्यानंतर केली आत्महत्या

धक्कादायक! सासऱ्याने सुनेवर शस्त्राने वार केल्यानंतर केली आत्महत्या
धक्कादायक! सासऱ्याने सुनेवर शस्त्राने वार केल्यानंतर केली आत्महत्या

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422

बदलापूर : मालमत्तेच्या वादातून बदलापूरमध्ये सासऱ्याने सुनेच्या डोक्यावर धारधार शस्त्राने हल्ला करत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. बदलापूर पश्चिमेतील शनीनगर परिसरात ही घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेरंबसृष्टी गृहसंकुलात राहणारे ७० वर्षीय किसन जाधव यांचे सुनेसोबत कडाक्याचे भांडण झाले. जाधव यांनी रागाच्या भरात सुनेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेनंतर भयभीत झालेल्या जाधव यांनी भीतीपोटी घराला आग लावून पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, जाधव यांच्या घराला लागलेली आग पाहून विझवण्यासाठी शेजारी पुढे सरसावले. आणि बदलापूर अग्निशामन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामन दलाने येऊन घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी जाधव पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर जाधव यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. तसेच घरातील आग विझवली. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.