*56 ची छाती 42 चा बाणा राजुरा नगरपालिकेवर भारी पडणार का युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
राजुरा : येत्या काही दिवसात राजुरा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे.गेल्या कित्येक वर्षापासून राजुरा नगरपालिका विद्यमान नगराध्यक्ष श्री.अरुण धोटे यांच्या ताब्यात आहे.राजुरा नगरपालिका निवडणूक लक्षात घेता राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप, भारतीय जनता पार्टी चे माजी आमदार संजय धोटे तसेच भा. ज.पा.चे प्रतिस्पर्धी माजी आमदार श्री सुदर्शन निमकर हे कामी लागले असल्याची चर्चा राजुरा शहरात चर्चिल्या जात आहे.
राजुरा नगरपालिकेत सध्या काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे.विद्यमान आमदार श्री सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे हे जोमाने तयारीला लागले असल्याचे बघायला मिळत आहे.तसेच राजुरा नगरपालिकेत आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी कंबर कसताना दिसत आहे.रोज इतर पक्षांतील कार्यकर्ते स्वाभिमान पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे.
राजुरा नगरपालिका साम दाम दंड भेद वापरून निवडणूक लढविण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांना आदेश आल्याची सुद्धा चर्चा शहरात सुरू आहे. स्थानिक आजी माजी आमदाराना राजुरा नगरपालिकेत युवा स्वाभिमान पक्षाचे राणा भारी पडणार का याची उत्सुकता शहरातील जनतेत वाढली आहे.त्यावरूनच युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक यांची ५६ ची छाती ४२ चा बाणा राजुरा नगरपालिकेवर भारी पडणार का युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा अशी बोलण्याची वेळ आली आहे.