राणा दाम्पत्याची खासदारकी, आमदारकी धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण… खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे

47

राणा दाम्पत्याची खासदारकी, आमदारकी धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण…

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने
रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे

राणा दाम्पत्याची खासदारकी, आमदारकी धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण... खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे
राणा दाम्पत्याची खासदारकी, आमदारकी धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण…
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने
रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

अमरावती सविस्तर वरुत खलील प्रमाणे आहे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा
यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.  निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने निवडणूक आयोगाने येत्या सहा महिन्यात यासंदर्भात रवी राणा यांच्यावर कारवाई केली जाईल असं शपथ पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे..
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी आधीच वाढलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे..16 नोव्हेंबरला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. त्यातच आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येते की काय अशी शंका उपस्थित होत आहे
आमदार रवी राणांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार, निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा ठपका
निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च?
बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे येत्या सहा महिन्यात रवी राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथ पत्रात सांगितलं. आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळून आले आहे.