चेक नांदगाव ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी श्री. प्रभाकर नागापुरे

49

*चेक नांदगाव ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी श्री. प्रभाकर नागापुरे

चेक नांदगाव ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी श्री. प्रभाकर नागापुरे
चेक नांदगाव ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी श्री. प्रभाकर नागापुरे

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

आज दि.१४/१०/२०२१ रोज गुरुवारला ग्रामपंचायत चेक नांदगाव येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. विविध योजनांची माहिती देण्यात आली.
सोबतच आज झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी चांगलीच चूरस बघायला मिळाली. गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली.
तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी अनेकांनी उमेदवारी स्वीकारली. परंतु गावातील जनतेचा कौल श्री. प्रभाकर आत्माराम नागापुरे यांचे बाजूंनी लागला.व श्री. प्रभाकर आत्माराम नागापुरे यांची बहुमताने तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करून एक त्रित्याऊंस नवनियुक्त समिती गठीत करण्यात आली.
नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष व समिती यांचे समस्त ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,व सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी अभिनंदन केले.