65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे महामानवाला अभिवादन.

78

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे महामानवाला अभिवादन.

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे महामानवाला अभिवादन.
65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोल येथे महामानवाला अभिवादन.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
काटोल:- 14ओक्टोंबर 1956 ला अशोक विजयादशमी दिनी परमपूज्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायासोबत नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमिवर बौद्ध धम्माची दिक्षा घेवुन क्रांतिकारी धम्मक्रांती केली त्या घटनेला आज 65 वर्ष झाले या मंगल दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काटोल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला माल्यार्पन व मानवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जानराव गावंडे होते तर प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगर पालिका काटोलचे माजी सभापती
दिगांबर डोंगरे, काटोल तालुका अध्यक्ष देवीदासजी घायवट, काटोल शहर अध्यक्ष सुधाकरजी कावळे, वनरक्षक प्रवीण नारनवरे, पोलीस विभागाचे सुनिल कोकाटे, व कर्मचारी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष रामरावजी पाटील, सुरेशराव देशभ्रतार, युवा आघाडीचे तालुका महासचिव सतीश पाटील, नीळकंठ गजभिये, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव काळभांडे, दिगांबर भगत, विनायक ढोणे, जिवन वाहने गुरुजी, रमाबाई तायडे, वानखेडे आदी उपस्थित होते.

यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन पुष्प अर्पण करून ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो धम्मचक्र प्रवर्तण दिन चिरायू हो अशा घोषणा देत महामानवाला अभिवादन करण्यात आले.

यानंतर दिगांबर डोंगरे जिवन वाहने गुरुजी, सुधाकर कावळे, देवीदासजी घायवट, वनरक्षक प्रवीण नारनवरे, जानरावजी गावंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर व कार्याविषई व धम्मचक्र प्रवर्तण दिनाच्या पवित्र दिनाविषयी विचार व्यक्त केले. संचालन नीळकंठ गजभिये यांनी तर, आभार सुरेशराव देशभ्रतार यांनी मानले. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.