आनंद बुद्ध विहारात धम्म चक्र प्रर्वतन दिन साजरा ।

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
9822917104
(ता.१६):- तालुक्यातील आनंद बुद्ध विहार गजानननगर येथे धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक व भोजनदान कार्यक्रमानी ६५ वा धम्म चक्र प्रर्वतन दिन साजरा करण्यात आला
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समिती चे प्रमुख तथा वरिष्ठ पत्रकार लीलाधर दाभे होते, तर प स सदस्य लीलाधर पटले, समाज सेवक पुरूषोत्तम दुर्गे, विहार समिती कोषाध्यक्ष नरेश गोंडाणे, सचिव अविनाश राऊत, समाज सेवक प्रकाश ढोके, मिलिंद गजभिये, मुख्यध्यापिका वसुंधरा पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंतामण सोमकुँवर, विनोद साखरे, उके, भिमटे, वानखेडे, रामटेके, बागडे, मेश्राम, ढाणके, खोब्रागडे आदींसह आनंद बुद्ध विहार सेवा समिती चे सर्व पदाधिकारी व बौध्द उपासक उपासिकांनी अथक परिश्रम घेतले