आता पाण्यातून येणार एका नव्या महामारीचे संकट; या आजाराने घेतले 11 बळी.

64

आता पाण्यातून येणार एका नव्या महामारीचे संकट; या आजाराने घेतले 11 बळी.

आता पाण्यातून येणार एका नव्या महामारीचे संकट; या आजाराने घेतले 11 बळी.

मिडिया वार्ता न्यूज रिपोर्टर✒
मुंबई,16ऑक्टोबर:- कोरोना वायरस महामारीने संपुर्ण जगात थैमान घालते होते. त्यामूळे लाखो लोक मरण पावले त्यात आता पाण्यातूनही एका नव्या महामारीचे संकट जगावर घोघावट आहे. पाण्यामध्ये बर्ड फ्लू संसर्गाचं दुर्मिळ प्रकरण नोंदवलं गेलं आहे. यामुळे 11 बळी गेले आहेत. तीन समुद्री प्राण्यांसह एका कोल्ह्याचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

इंग्लंडमधील वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाच हंस, पाच समुद्री सील आणि कोल्ह्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळं जगभरातील शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ काळजीत पडले आहेत. हा रोग सागरी प्राण्यांमध्ये पसरू लागला तर, जगात साथीच्या रोगाची नवी लाट येऊ शकते आणि ही खूप धोकादायक असू शकते.

हा संसर्ग वर्ष 2020 च्या अखेरीस पसरला होता. परंतु तो अद्याप उघड करण्यात आला नव्हता. कारण शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करत होते. तसेच, इंग्लंड सरकारला कोरोनाच्या महामारीत सापडलेल्या जगाला आणखी घाबरवण्याची इच्छा नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. सागरी सील, कोल्हा हे सस्तन प्राणी असून बर्ड फ्लू सस्तन प्राण्यांना सहजतेनं संक्रमित करत नाही. परंतु, सील आणि कोल्ह्याचा या आजारानं मृत्यू झाल्यानंतर शास्त्रज्ञ काळजीत पडले होते. त्यांचा अभ्यास नुकताच जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये प्रकाशित झाला आहे.

या प्राण्यांमध्ये आढळलेल्या बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची तपासणी केली असता या विषाणूमध्ये उत्परिवर्तन झाल्याचं आढळून आलं. हा H5N8 विषाणू वायरस होता. हा विषाणू पक्ष्यांमधून सस्तन प्राण्यांमध्ये संक्रमित झाला. तथापि, अशा प्रकारचं उत्परिवर्तन सामान्यतः मानवांशी संबंधित आहे. परंतु, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये मानवाच्या संसर्गाशी संबंधित एकही प्रकरण समोर आलं नाही. या प्राण्यांच्या मृत्यूनंतर बर्ड फ्लूचा विषाणू कोणत्याही मनुष्यापर्यंत पोहोचला नाही.