11 वर्षीय मुलगी वयात आली काय बघायला, 45 वर्षीय नराधम पित्याचा स्वताःच्या मुलीवर अत्याचार.

✒️परशुराम शेवंगे ✒️
पुणे जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9604014282
पिंपरी चिंचवड:- पुणे जिल्हातील
पिंपरी चिंचवड येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 45 वर्षीय नराधम पित्यानेच आपल्या स्वताःच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या नराधम पित्याने अत्याचार केल्यानंतर कोणाला सांगितले तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेले काही महिण्यापासुन हा अत्याचाराचा प्रकार सुरु होता, मात्र पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली.
नराधम पित्याने आपल्याच स्वताःच्या अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न केला. जर तू कोणाला सांगितलेस, तर मी तुला जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या लैंगिक अवयवांना वारंवार हात लावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन बापाने केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्या नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.