ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.

58

ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.

✒️आशीष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट १८/१०/१/२१ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सण, उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच दसरा सण उत्साहात पार पडल्यानंतर आता ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.
त्यामध्ये राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दि. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद साजरी केली जाणार आहे. या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात असलेल्या लोकांव्यातिरिक्त अतिरिक्त 5 लोकांना पोलिसांची परवानगी घेऊनच सहभागी करून घेता येणार आहे.

जारी केलेल्या या नियमावलीबाबत रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी म्हंटले आहे की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने 10 ट्रक आणि 150 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.